4एल कन्सेप्ट: माझ्या यशाचे रहस्य

तुम्हाला माझ्या यशाचे रहस्य किंवा फॉर्म्युला समजून घ्यायचा आहे का? मग दोन मिनिटे वेळ काढून हे नक्की वाचा. माझ्या लहानपणापासून मला प्रत्येक गोष्टीत मुळापासून कारण शोधून काढण्याची सवय आहे. बरेचदा माझ्या घरातील लोकांना माझ्या ह्या सवयीची चिड यायची पण माझी हीच सवय मला माझा व्यवसाय वाढीसाठी उपयुक्त ठरते आहे. माझ्या ह्या सवयीला मी 4एल कन्सेप्ट म्हणते. L- Like L- Love L-Listen L- Learn. आपण काहीही करत असो, आपण वयाच्या कोणत्याही टप्प्यावर असताना   प्रत्येक गोष्ट जी आपल्याला आवडली(like) त्यावर आपण प्रेम (love) केलं त्या बद्दल ऐकलं (listen) त्याचा अभ्यास (learn) केला म्हणजेच त्याबद्दल मुळापासून काम केले तर आपल्याला त्याचे संपूर्ण ज्ञान मिळते, आपण त्यामध्ये एक्स्पर्ट होतो. हेच माझ्या यशाचे रहस्य आहे.. तुमच्या  अशा काही लहानपणीच्या सवयी आहेत का ज्यांचा तुम्हाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मदत झाली आहे??