एका दगडावर पाण्याची धार सतत पडत असते तेव्हा कालांतराने त्या दगडाला पण तडे जातात. तुम्हाला माहित आहे का पाण्यामधे कोणती अशी शक्ती असते ज्यामुळे दगडाला सुध्दा तडे जातात? तर ही शक्ती असते सातत्य. सातत्याने कोणतीही गोष्ट केली तर ती तुमच्या आयुष्यात तुमच्या प्रगतीमध्ये खूप फरक पाडू शकते. आपल्या सवयी मागचे सायन्स हे आहे की आपली बुध्दी आपल्या शरीराला एखादी गोष्ट करण्याची सुचना देते मग आपले शरीर ती कृती करते. जर ह्या कृतीत २१दिवस सातत्य ठेवले तर मग आपल्याला ती सवय लागते आणि आपण ९० दिवस जर सातत्य ठेवले तर ती सवय कायमस्वरूपी आपल्याला लागते. आपल्या टीम मेंबर्सना त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा रिपोर्ट देण्याची सवय लावण्यासाठी त्यांना २१ दिवस सतत आठवण करा नंतर त्यांना अधूनमधून विचारणा करत राहा अशा प्रकारे ९० दिवसांनी ते आपणहून स्वतःच तुम्हाला आपल्या कामाचा रिपोर्ट देतील.