आपल्या व्यवसायाचा DNA…

People management 1

व्यवसायात पिपल मॅनेजमेंट करताना बरेच बिझनेसमन आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या वयाच्या,तसेच कामाच्या वर्षांच्या अनुसार सिनीयरीटी प्रमाणे जबाबदा-या देतात आणि ह्यालाच पिपल मॅनेजमेंट समजतात आणि अपेक्षित रिझल्ट मिळाला नाही तर नाराज होतात. खरे पाहता व्यवसायातील पिपल मॅनेजमेंट हि सातत्याने चालणारी प्रोसेस आहे आणि जर तुमचा बिझनेस हा पिपल ड्रिव्हन असला तर तो अत्यंत कटकटीचा वाटतो ह्या उलट जर तो सिस्टीम ड्रीव्हन असला तर पिपल मॅनेजमेंट सोपी होते आणि व्यवसाय सुखाचा वाटतो. नेहमीच आपल्या कर्मचाऱ्यांना सिस्टीम आणि प्रोसेस व्दारे जबाबदा-या द्या.आपल्या कामातील ह्या  बदलामुळे त्या बिझनेसमनला व्यवसाय वृद्धीसाठी वेळ मिळतो.

 

 

People management 2

 

माझ्या ज्वेलर्स क्लायंट कडे जेव्हा पदभरती  करण्यासाठी इंटरव्ह्यू  घेतले जायचे तेव्हा त्यांना काही जुजबी प्रश्न विचारले जायचे, ओळख विचारली जायची आणि मालकाला योग्य वाटेल ते काम ती जबाबदारी सोपवली जायची, काही दिवस बघून तुला जमत नाही असे सांगून काढून टाकले जायचे अथवा तो उमेदवार सोडून जायचा. इथे सतत उमेदवार सोडून जायचे प्रमाण वाढले मग मला संपर्क केला. मी जेव्हा त्यांच्या कडे संपूर्ण र्ऑडीट केले तेव्हा मला अनेक त्रुटी आढळून आल्या.

 

 ह्यामध्ये इंटरव्ह्यू साठी आलेल्या उमेदवारांचे स्कील, एक्स्पर्टाईझ, अनुभव विचारात घेतले जात नव्हते, कोणत्या पदांसाठी त्याने अर्ज केला आहे? त्याबद्दल त्याला किती माहिती आहे? ज्या कंपनीमध्ये तो इंटरव्ह्यूला आला आहे त्याबद्दल असणारी माहिती? ज्या फिल्ड साठी तो इंटरव्ह्यूला आला आहे त्याबद्दल त्याला किती माहिती आहे? असे काही विचारात घेतले जायचे नाही. तसेच इंटरव्ह्यू साठी काही सिस्टीम & प्रोसेस नाही, त्याला त्याच्या क्षमतेनुसार जबाबदारी दिली जायची नाही, सिलेक्शन नंतर काही ट्रेनिंग नाही, त्या उमेदवाराला  काम शिकण्यासाठी काही वेळ दिला जायचा नाही अशी काही कारणे आढळून आली तसेच त्यांच्या कडे अनेक वर्षांपासून काम करणारे काही जुने उमेदवार होते जे ह्या नवीन उमेदवारां बरोबर करत असलेला व्यवहार हे सुद्धा त्यामागचे एक महत्त्वाचे कारण होते.

 

peoplemanagment3

 

आपल्या कडे फार पूर्वीपासून एक म्हण चालत आलेली आहे.” यथा राजा तथा प्रजा” म्हणजे जसा राजाचा आचार ,विचार आणि राज्य कारभार असेल तशीच आणि त्याच प्रमाणे प्रजेचा सुध्दा आचार, विचार आणि व्यवहारी असेल. जर राजा शिस्त,नियम पाळणारा नसेल तर प्रजा पण तशीच वागणार.

श्री. राधाकृष्ण पिल्लई ह्यांच्या “Chanakya’s 7 secrets of leadership” ह्या पुस्तकात त्यांनी एका ठिकाणी असे लिहिले आहे की “एकटा माणूस संपूर्ण व्यवस्थेचा कायापालट करू शकतो का असा प्रश्न अनेकदा केला जातो.  प्रत्यक्षात एकच व्यक्ती परिवर्तन घडवू शकते. अर्थात, सांघिक प्रयत्नांमुळे बदल शक्य होतो.  तरीही, परिवर्तनाची संपूर्ण प्रक्रिया त्या एका व्यक्तीपासून सुरू होते ज्याने बदल घडवला – तो परिवर्तनवादी नेता.

 

आता तुम्ही म्हणाल की हे वरील सगळं आणि पीपल मॅनेजमेंट काय संबंध? प्रिय व्यावसायिक मित्र मैत्रिणींनो आपल्या व्यवसायात सुद्धा वेगळे काही घडत नसते. जसा मालक असेल तसेच सर्व कर्मचारी असतात. जर मालक व्यवसायात ठरलेल्या नियमानुसार वागत असेल, व्यवहार करत असेल तर कर्मचाऱ्यांना सुध्दा तसे वागावेच लागते किंबहुना ते वागतातच. प्रत्येक व्यावसायिकाने पीपल मॅनेजमेंटची सुरुवात स्वतः पासूनच करायला हवी. मी मालक आहे म्हणून कसाही वागले तर चालेल असे नसते. तुम्ही स्वतः आहात जे आपल्या व्यवसायात ही सुरुवात करु शकता.

 

#Peoplemanagement4

 

माझ्या एका ज्वेलर्स क्लायंट कडे घडलेली घटना.. एका कस्टमरने बांगड्या ऑर्डर केल्या होत्या. 25 दिवसांनी मिळतील असे सांगितले होते. कस्टमरला सांगितलेल्या दिवशी ते शोरूममध्ये पोहोचले आणि आपल्या ऑर्डर केलेल्या बांगड्यांची मागणी केली, काऊंटर वरील ज्या स्टाफला ते भेटले त्यांना काहीच कल्पना नव्हती त्यांनी थोडी शोधाशोध केली आणि मालकांना विचारले. त्यांनी पण शोधले, ऑर्डर पावती वरुन विचारणा केली आणि लक्षात आले की अजून कारागिरांनी ऑर्डर पाठवलीच नाही. ज्या स्टाफने ऑर्डर घेतली होती तो सोडून गेला होता नंतर कोणीही त्याचा फॉलोअप घेतला नाही. इकडे कस्टमर कडे काही दिवसांत लग्न होते आणि बांगड्या वेळेवर मिळत नाहीत म्हणून ते चिडले. आता इथे चूक कोणाची? मालक? स्टाफ? कारागीर?

 

आपल्या व्यवसायात एखाद्या व्यक्तीला कर्मचारी म्हणून नेमणूक करताना सर्वप्रथम तो कर्मचारी काय करू शकतो हे बघणे जरूरी आहे. आपल्या कडे त्या व्यक्तीला त्याच्या पदानूसार देण्यात येणाऱ्या जबाबदारी (Job Discription) तयार असणे गरजेचे तसेच तो ज्या डिपार्टमेंटला नेमला जाणार आहे त्या डिपार्टमेंटमधील कार्यप्रणाली (SOP – standard operating system) सुध्दा तयार असणे गरजेचे आहे

 

#peoplemanagment5

 

आपण ह्या सिरीज मधील मागच्या भागात समजून घेतले ते SOP/JD ह्या बद्दल.. आज आपण समजून घेऊ ह्या पुढील पायरी..

 

मंडळी हो आपल्या घरात जेव्हा एखादी नवीन व्यक्ती येते किंवा आपण कुठे नवीन म्हणून जातो तेव्हा आपण तिथे वावरताना अतिशय संभ्रमात असतो. नक्की काय करायचे? कुठे जायचे? कुठे बसायचे? कोणाशी बोलायचं? काय बोलायचं? असे अनेक प्रश्न ह्या संदर्भात आपल्या समोर असतात पण तेव्हा त्या ठिकाणी असणाऱ्या एखाद्या माहितगार व्यक्ती कडून आपल्याला जेव्हा तिथले सगळे मार्गदर्शन मिळते तेव्हा मग आपला वावर हा सहज होऊ लागतो.

 

आपल्याकडे जॉईन होण्यासाठी आलेल्या नवीन कर्मचाऱ्यांची पण नेमकी अशीच स्थिती असते. आपल्या संस्थेच्या संदर्भात संपूर्ण माहिती, संस्थेची कार्यपध्दती, पॉलिसी, प्रॉडक्ट ज्ञान,असे आणि अन्य प्रकारच्या माहितने त्यांना प्रशिक्षित करणे आवश्यक असते. मुख्य म्हणजे त्यांना आपण दिलेल्या कामाची , डिपार्टमेंटची जबाबदारी ह्या बद्दल संपूर्ण तपशीलवार माहिती आणि ट्रेनिंग देणे गरजेचे आहे.  ह्यासाठी आपण स्वतः ते समजून घेणे पण गरजेचे आहे.

 

People Management6

 

प्रिय ज्वेलर्स मित्रांनो…

 

*RRR Team ne to Oscar jit liya aapke Team Ka kya?*

 

आपल्या सिरीज मधील मागच्या भागात आपण रिक्रुटमेंट प्रोसेस, सिस्टीम प्रोसेस, वेगवेगळ्या पोस्ट प्रमाणात जबाबदारी वगैरे मुद्यांची माहिती घेतली आज आपण बघणार आहोत टीम मेंबर्सच्या जबाबदारी बद्दल, आपण एखाद्या व्यक्तीला कोणतेही पद देताना सर्वप्रथम आपल्याला त्या व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक क्षमता, स्किल्स समजून घेणे आवश्यक आहे. कारण दिलेल्या जबाबदारी सांभाळण्यासाठी जर तो व्यक्ती सक्षम नसेल आणि म्हणून आपल्याला जर कामाचे रिझल्ट मिळत नसतील तर आपण त्यांना दोषी धरतो आणि नोकरीवरून काढून टाकते, अथवा दुसरी जबाबदारी देणे असे काही करतो पण इथे दोष त्या व्यक्तीचा नसून आपला असतो.  तेव्हा जुना कर्मचारी असो अथवा‌ नवीन त्यांना कामाची जबाबदारी देताना नेहमीच Right people…Right work …Right result अशी सिस्टीम सुरुवाती पासूनच ठरवा.